Showing posts with label Social networking.. Show all posts
Showing posts with label Social networking.. Show all posts

Sunday, 20 October 2013

ऑफीसमध्ये मोबाईल नेट बंदी

अरे थांब बॉस आहे नंतर पींग करते..., वेट फॉर वाईल ही इज हीअर... अरे सॉलिड लोचा झालायं रे आमच्या ऑफीसमध्ये जॅमर लावण्याच मेल आलाय आता नो मोबाईल इंटरनेट दीवसभर ऑफलाईनच रहावे लागणार असे दीसतेय. मागील काही दिवसापासून ऑफीसला जाणा-या नेटक-यांच्या संवादत ही वाक्ये येऊ लागली आहेत. कारण आता अनेक ऑफीसेसने आपल्या कर्मचा-यांचा प्रोडक्टीव्ह वेळ मोबाईलवरील व्हॅट्सअॅप चॅट, फेसबूक आणि सर्फींगमध्ये जाऊन नये यासाठी सेटिंग लावण्यास सुरवात केली आहे. मोबाईल जॅमरच्या पर्यायामुळे अनेकांचा ऑनलाइन राहण्याचा लोच्या होणार आहे.

कंप्यूटरनंतर आता मोबाईल नेट बंदी
?
ज्यावेळी भारतामध्ये फेसबुकचे फॅड होते त्यावेळी २०१०पासून कंपन्यांनी ऑफीसेसमधून सोशलनेटवर्कींग साईट्सचा अॅक्सेस बॅन केला होता. गुगलने गुगल प्लस सर्वीस सुरु केल्यापासून अनेक कंपन्यांनी तर गुगलचे सर्व्हरही बॅन केले आहेत. मात्र मागील वर्षभराच्या काळात स्वत आणि मस्त स्मार्टफोन सर्वाच्याच खिशात दिसू लागल्याने ऑफीसच्या कंप्यूटरवरुन होणार सर्फिंग अगदीच पर्सनल लेव्हलवर मोबाईलवरुन होऊ लागले आहेत. काही हजारात उपलब्ध होणारे मोबाईल, स्वस्त: इंटरनेट प्लॅन्स अनेक ऑफीसेसमध्ये असणारे फ्री वायफाय यामुळे अनेकांचा ऑफीसच्या वेळेतील मैल्यावान वेळ पर्सनल चॅटसाठी जाऊ लागला.

काय उपाय केले आहेत कंपन्यांनी

सरेंडर मोबाईल
काही कंपन्यांमध्ये वर्कींग डेक्सवर जाण्याआधी आपला मोबाईल सरेंडर करण्यासाठी ऑफीसच्या प्रवेशद्वरातच काऊण्टर असून कामाच्या वेळेत मोबाईल सरेंडर करावा लागतो. आठ तासाच्या कामानंतर तो मोबाईल परत करण्यात येतो. मात्र अनेकदा महत्वाचे कॉल मिस होत असल्याने कर्मचा-यांना ही पद्धत सोयीस्कर वाटत नाही.

मोबाईल जॅमर- कॉलेजमधील वर्गामध्ये लावण्यात येणा-या जॅमरप्रमाणे अनेक ऑफीसेसने मोबाईल जॅमबद्दल विचार करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी जॅमर लावण्यात आले असून हे जॅमर दोनप्रकारचे असतात. एकाप्रकारेमध्ये फक्त इंटरनेट ब्लॅक करण्यात येते तर काही ठिकाणी मोबाईलच्या सिमची रेंजच ब्लॅक करण्यात येते. मात्र इंटरनेट ब्लॉकचा पर्यायामुळे फोन कॉल्स आणि मेसेजची अडचण येत नसल्याने या पर्याय लवकरच सर्व ऑफीसेसमध्ये वापरण्यात येण्याची शक्यता आहे.

ओन्ली बेसीक फोन्स
अनेक कंपन्यांनी जॅमरचा खर्चीक पर्यायाला उपाय म्हणून कर्मचा-यांनी कामावर येताना मोबाईल फोन आणल्यास तो बेसीक मोबाईल फोन असावा अशी अट घातली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरा नसलेले मोबाईल अणण्याची अटही या कंपन्यांना उपयोगी ठरत आहे. अनेक कॅमेरा नसणा-या मोबाईलमध्ये इंटरनेटची सुविधाच नसल्याने जॅमरचा खर्च येत नाही.

वायफाय बंद
मोबाईलवरुन ऑफीसची कामे करता येईल या दृष्टीने देऊ केलेल्या वायफायवरुन व्हॅट्सअॅप आणि फेसबुकचा जास्त वापर करुन लागल्याने अनेक कंपन्याने मोफत वायफाय बंद तर केले आहेच त्याशिवाय इंटरनेट रेंजवर बंदी घालण्यासाठी जॅमर लावण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहचले आहेत.

आता कर्मचा-यांवर ऑफीसेसने ही सोशल बंदी घालण्याचे ठरवले असले तरी ती कितपत टिकतेय हे अत्ताच सांगणे कठीण आहे. पण तुम्हाला या बद्दल काय वाटते ही बंदी असावी का? एखादी व्यक्ती आपले काम पूर्ण करुन जर थोडावेळ मोबाईलवर चॅठ करत असेल तर त्यात चुक काय? म्हणजे कर्मचा-यांनी काम ठेऊन टाईमपास केल्यास त्यांच्यावर कारवाई होणे योग्यच आहे मात्र सरसकट बंदी किती योग्य आहे?


Friday, 6 September 2013

फेसबूकवरील व्हर्च्युअल आयडेंटीटी सुसाईड

तारीख ३१ मे २०१० अमेरीकेतील ३३ हजार फेसबूक युझर्सने क्विट फेसबूक डेच्या निमीत्ताने एकाच दिवशी कायमचे लॉग आऊट म्हणत व्हर्च्युअल आयडेंटीटी सुसाईड केला. एका दिवसात दिवसामध्ये इतका मोठ्या प्रमाणात फेसबूक यूझर्सने अकाऊण्ट डिलीट करण्याची ही पहिलीच वेळ असावी. मात्र त्यानंतर अनेकदा अनेकांनी आपल्या मित्रमैत्रिणींसह फेसबूकला एकाच वेळी टाटा बाय बाय म्हटले आहे. पण का?

व्हर्च्युअल आयडेंटीटी सुसाईड म्हणजे नेमकी काय?

फेसबुक अकाऊण्ट सुरु केल्यानंतर व्यक्ती स्वत:ला फेसबुकच्यामाध्यमातून व्हर्च्युअल जगासमोर सादर करते. मग तेथे पोस्ट होणारी स्टेटस, फोटो, फ्रेण्डलिस्ट यावरुन त्याच व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरील लोक त्या व्यक्तीला जज करतात. त्यानुसार प्रत्येकाची व्हर्च्युअल इमेज तयार होते. मात्र अनेक वर्षापासून रोज उठून कंप्यूटर स्क्रीन समोर बसून तेच तेच करण्याचा तरुणाईला कंटाळा येऊ लागला आहे. एका लाईकने किंवा कमेन्टने अपसेट होणारा मू़ड, सारखा सारखा बदलणारा फेसबुक इंटरफेझ, प्राव्हसी सेटिंग संभाळताना करावी लागणारी कसरत या पासून ते अगदी इतर मित्रांनी अकाऊण्ट डिलीट केले म्हणून करण्यापर्यंत अनेक कारणांनी लाखोच्या संख्येत लोक फेसबूकवरुन कायमची एक्झीट घेत आहेत. एकट्याने किंवा एखाद्या ग्रुपने सर्वानुमते एकाच वेळी फेसबुक क्विट करण्याच्या याच ट्रेण्डला व्हर्च्युअल आयडेंटीटी सुसाईड असे म्हणतात. सध्या अनेक देशात हा ट्रेण्ड इन आहे.
मागील दोन वर्षापासून सुरु असणारा हा ट्रेण्ड सध्या जरी भारतात दिसून येत नसला तरी लवकरच असे व्हर्च्युअल आयडेंटीटी सुसाईड किंवा सोशल नेटवर्किंग सुसाईडचे प्रमाण वाढण्याची शक्यात नाकारता येणारा नाही असे चित्र दिसत आहे. अमेरीका आणि युके मध्ये सप्टेंबर महिन्यात सादर केलेल्या अहवालानुसार कोटी १० लाख युझर्सने फेसबूककडे कायमची पाठ फिरवली असून लवकरच हा ट्रेण्ड जगभरात दिसून येणार आहे.

व्हर्च्युअल आयडेंटीटी सुसाईडची महत्वाची कारणे

अमेरीकेतील गुप्तहेर यंत्रणा इंटरनेटवरील डेटावर गुप्त पद्धतीने लक्ष ठेवत असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांनी फेसबूकवरुन आपली खासगी माहिती सरकार आणि जगापासून लपवण्यासाठी जवळ जवळ ५० टक्के लोकांनी प्राव्हसीचे कारण देत अकाऊण्ट डिलीट केले आहेत.

सतत फेसबुकवर बसण्याच्या सवयीमुळे आपल्याला इंटरनेटचे व्यसन लागण्याची भीती असल्याने इंटरनेटपासून चार हात लांब राहण्यासाठी अनेकांनी फेसबूक अकाऊण्ट डिलीट केले आहे.

त्यापाठोपाठ फेसबूकचा वाईट कस्टमर सपोर्ट, वारंवार बदलणारा इंटरफेस, अती जाहीरांचा सतत होणारा मारा यामुळे लोकांनी फेसबुक सोडले आहे.

फेसबूकची पॉप्यूलॅरीटी कमी झालेले देश
अमेरीका, ब्रिटन, रशिया, चीन, कॅनडा, नॉर्वे

फेसबूकची पॉप्यूलॅरीटी कायम असलेले देश
भारत, मॅक्सीको, अर्जेन्टीना, कोलंबिया, थायलंड, फिलीपीन्स, ब्राझील, फ्रान्स, तुर्की

कोण सोडते फेसबूक
ज्यांना फेसबुकची सवय लागण्याची भीती वाटते
फेसबुक सोडणा-यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक
ज्यांना फेसबुकवर अगदी कमी फ्रेण्ड्स आहेत
ज्यांची फेसबुकवरील अॅक्टीव्हीटी लेव्हल खूप कमी आहे.

फेसबूक प्रायव्हसीसाठी अॅप्स्
व्हर्च्युअल आयडेंटीटी सुसाईडचा वाढता ट्रेण्ड पाहून अनेक वेबसाईट्सने फेसबूकवरील माहिती लोकांपासून लपवून ठेवण्यासाठी अॅप्सही उपलब्ध करुन दिले आहेत. सुसाईड मशीन, सेपुकुसारख्या अॅप्समुळे तुमच्या फेसबुकवरील खासगी माहिती, फ्रेण्डलीस्ट, फोटो आणि तुमचे अकाऊण्ट लोकांना अॅक्सेस करता येणार नाही अशी सोय करुन देण्यात आली आहे.

भारतात काय स्थिती

भारतातील स्मार्टफोनची संख्या वाढत असल्याने सध्यातरी भारतातील अॅक्टीव्ह युझर्सची संख्या वाढत असली तरी काही हा ट्रेण्ड बदलू शकतो. सध्या पालकांचा फेसबूकवरील उपस्थीतीमुळे अनेकजण फेसबूक लॉगइन करणे टाळत असल्याचा ट्रेण्ड भारतात दिसून येत आहे. हर्चूअल आयजेन्टीटी सुसाईड ही त्याचीच पुढील पायरी असू शकते.

तुमच्यापैकी कोणाला कधी असे वाटले आहे का करावे एकदाचे अकाऊण्ट डिलीट आणि पुन्हा पहिल्यासारखे जगावे? इंटरनेटच्या या मायाजाळातून कायमचे बाहेर पडावे? व्हच्यूअल जगण्यापेक्षा -याखु-या आयुष्यात -याखु-या माणसांना आपला वेळ द्यावा?

Monday, 8 July 2013

WhatsApp : No I am happy without you!

It was first day of college. I was much excited about the new media lectures which cover internet & technology. After all, who would not want to learn the same thing in education & professional life at same time? The lecture was just as  good as I had expected. At the end of the lecture our professor talked about our assignments. Addressing the class, he asked if there was anyone without a smartphone. Without hesitating I raised my hand. I turned around to see if there were any other hands in the air. I saw just one girl, who I couldn’t see clearly who didn’t have a smartphone. I quickly put down my hand. Rest of the world was in their own life discussing the assignments. But at that moment I felt like tribal living in socialize world.
image courtesy-www.techmagnifier.com
(edited)

However, when I reasoned with myself, my mind raced to many of my friends who plan to meet up on but when they meet they spend more than half of the time phones. Mostly on WhatsApp informing their respective GF n BF about their locations, what’s cooking at home, with whom they are, etc.
when I see this happening all around me I realize that people focus more on how PRESENT they are virtually than enjoying their real time together. 

I don’t have WhatsApp but I regularly call my friends relatives when I miss them or want to talk to them. It may be so cool to have WhatsApp in your cell phone but does anyone really need to be on their Facebook account for more than 12 hrs a day?  My whole argument is that do we really need application like WhatsApp? Am I not a social guy if I don’t have this application in my phone? Am just disconnected with others? 

Friday, 5 July 2013

फेसबुकवर लिंक बघा, बॅग पॅक करा आणि ट्रेकला चला

पावसाळा सुरू झाला की पाठीवर सॅक टाकून ट्रेकर्स ट्रेकला निघतात. या ट्रेक्सचं प्लॅनिंग दोन-दोन महिने एफबी पेजेसवर आधी सुरू झालेलं असतं. पूर्वी प्रत्यक्ष भेटून, फोनवर ट्रेकचं प्लॅनिंग केलं जायचं, आता मात्र ही सगळी ठरवाठरवी चालते ती ऑनलाइन. या पेजमार्फत मेंबर्सना ट्रेकची माहिती देण्यात येते. ज्या गडावर जायचंय त्याच्या माहितीपासून ते कोणत्या तारखेला किती वाजता आणि कुठे भेटायचं, काय-काय सोबत घ्यायचं, बारीकसारीक तपशील देण्यात आलेला असतो....

'अरे, ही लिंक बघ... काय म्हणतोस, जाऊया का?', 'संकेत इज गोइंगी टू हरिशच्ंद्र फोर्ट...' 'माहुली ट्रेक इन्व्हीटेशन...' 'मी म्हणतो आपण जाऊया रे टीटीएमएम बेसिसवर आहे. तसंही आपल्याला गडाचा रस्ता कुठे माहिती आहे.' 'यू आर टॅग्ड इन फोटो' 'काय मस्त ट्रेक होता यार...', 'सो गाईज् बी रेडी फॉर दिस मान्सून कॉझ....' फेसबुकवर या आणि अशाच पोस्ट, फिडबॅक सध्या पाहायला मिळत आहे. तरुणाई ट्रेकच्या प्रेमात पडली आहे. अनेकांचे कव्हर फोटो, डीपी ट्रेकच्या फोटोजनी फेसबुकवरही मान्सूनची हिरवळ पसरली आहे. यामागचं कारण म्हणजे फेसबुकवर सध्या फुल टॉप गिअरमध्ये असणारे ट्रेकिंग ग्रुप्स... अनेकांच्या फ्रेंडलिस्टमधले लोक कुठल्या ना कुठल्या ट्रेक ग्रुपचे सदस्य आहेतच. काही ग्रुप मेंबर्सची संख्या हजारोत आहे. मज्जा मस्ती मैत्री या सूत्राच्या आधारे ट्रेक आयोजित केले जातात. मैत्री नसली तरी ट्रेकला गेल्यावर ती होतेच. त्यामुळेच ट्रेकवरुन आल्यावर लगेचच फ्रेंडलिस्ट अपडेट होतात.

ऑनलाइन ट्रेकिंग प्लॅन्स

ट्रेकिंग ग्रुप्सच्या अॅडमिनचे प्लॅन्स एप्रिल-मेपासूनच सुरु होतात. मे महिना संपण्याआधी या पेजेसवर मस्त टिझर्स फोटो पोस्ट केले जातात. मेंबर्सला कुठे जाण्यात रस आहे याबद्दल पोलमार्फत जाणून घेतलं जातं. जनता का मत खरोखरच जास्त असेल तर प्लॅनमध्ये बदल करुन एखादा अॅडिशनल ट्रेक अॅड केला जातो.

प्रत्येक ट्रेकसाठी एक इव्हेंटपेज बनतं. मात्र या इव्हेंटमध्ये फेसबुकवर जॉइन केलं याचा अर्थ तुमची जागा पक्की झाली असा घेतला जात नाही. तुम्हाला इव्हेंट होस्टला फेसबुक मेसेज पाठवून जागा कन्फर्म करावी लागते. या पेजमार्फत मेंबर्सना ट्रेकची सर्व माहिती देण्यात येते. किल्ला कसा आहे, त्याचं ऐतिहासिक महत्व. चढण कशी आहे, कोणत्या तारखेला किती वाजता आणि कुठे भेटायचं, कोणत्या स्टेशनला ट्रेन किती वाजता येणार, काय काय सोबत घ्यायचं, ट्रेकमध्ये काय काय काळजी घ्यायची याची नियमावली, तसंच ट्रेकची फी कशी देता येईल असा बारीकसारीक तपशील देण्यात आलेला असतो. अनेकदा सकाळी भेटल्यावरच रेल्वे स्टेशनवर ऑर्गनायझर्स केविलवाण्या चेह-याने सगळ्यांकडून पैसे गोळा करतात. त्यामुळे 'भाई छुट्टा नही है आगे जाओ'पासून सकाळी साडेपाचला सुरू होणारी मजा-मस्ती अगदी रात्री घरी जाईपर्यंत सुरु असते.

फेसबुकवर अॅक्टिव्ह असणारी पेजेस

- मुंबई हायकर्स, ट्रेक मेट्स इंडिया, रानवाटा
- सह्याद्री मित्र, ट्रेक क्षितीज, स्वच्छंद
- ट्रॅव्हलमास्टर गोगो, दुर्गवीर, महाराष्ट्र ट्रेकर्स, ब्रेक फ्री जर्नीज, वाइल्ड व्हिजन ट्रेक
- सह्याद्री ट्रेकिंग, माऊंटन मार्क्स ट्रेकिंग