तारीख ३१ मे २०१० अमेरीकेतील ३३ हजार फेसबूक युझर्सने क्विट फेसबूक डेच्या निमीत्ताने एकाच दिवशी कायमचे लॉग आऊट म्हणत व्हर्च्युअल आयडेंटीटी सुसाईड केला. एका दिवसात दिवसामध्ये इतका मोठ्या प्रमाणात फेसबूक यूझर्सने अकाऊण्ट डिलीट करण्याची ही पहिलीच वेळ असावी. मात्र त्यानंतर अनेकदा अनेकांनी आपल्या मित्रमैत्रिणींसह फेसबूकला एकाच वेळी टाटा बाय बाय म्हटले आहे. पण का?
व्हर्च्युअल आयडेंटीटी सुसाईड म्हणजे नेमकी काय?
फेसबुक अकाऊण्ट सुरु केल्यानंतर व्यक्ती स्वत:ला फेसबुकच्यामाध्यमातून व्हर्च्युअल जगासमोर सादर करते. मग तेथे पोस्ट होणारी स्टेटस, फोटो, फ्रेण्डलिस्ट यावरुन त्याच व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरील लोक त्या व्यक्तीला जज करतात. त्यानुसार प्रत्येकाची व्हर्च्युअल इमेज तयार होते. मात्र अनेक वर्षापासून रोज उठून कंप्यूटर स्क्रीन समोर बसून तेच तेच करण्याचा तरुणाईला कंटाळा येऊ लागला आहे. एका लाईकने किंवा कमेन्टने अपसेट होणारा मू़ड, सारखा सारखा बदलणारा फेसबुक इंटरफेझ, प्राव्हसी सेटिंग संभाळताना करावी लागणारी कसरत या पासून ते अगदी इतर मित्रांनी अकाऊण्ट डिलीट केले म्हणून करण्यापर्यंत अनेक कारणांनी लाखोच्या संख्येत लोक फेसबूकवरुन कायमची एक्झीट घेत आहेत. एकट्याने किंवा एखाद्या ग्रुपने सर्वानुमते एकाच वेळी फेसबुक क्विट करण्याच्या याच ट्रेण्डला व्हर्च्युअल आयडेंटीटी सुसाईड असे म्हणतात. सध्या अनेक देशात हा ट्रेण्ड इन आहे.

मागील दोन वर्षापासून सुरु असणारा हा ट्रेण्ड सध्या जरी भारतात दिसून येत नसला तरी लवकरच असे व्हर्च्युअल आयडेंटीटी सुसाईड किंवा सोशल नेटवर्किंग सुसाईडचे प्रमाण वाढण्याची शक्यात नाकारता येणारा नाही असे चित्र दिसत आहे. अमेरीका आणि युके मध्ये सप्टेंबर महिन्यात सादर केलेल्या अहवालानुसार १ कोटी १० लाख युझर्सने फेसबूककडे कायमची पाठ फिरवली असून लवकरच हा ट्रेण्ड जगभरात दिसून येणार आहे.
व्हर्च्युअल आयडेंटीटी सुसाईडची महत्वाची कारणे

अमेरीकेतील गुप्तहेर यंत्रणा इंटरनेटवरील डेटावर गुप्त पद्धतीने लक्ष ठेवत असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांनी फेसबूकवरुन आपली खासगी माहिती सरकार आणि जगापासून लपवण्यासाठी जवळ जवळ ५० टक्के लोकांनी प्राव्हसीचे कारण देत अकाऊण्ट डिलीट केले आहेत.
सतत फेसबुकवर बसण्याच्या सवयीमुळे आपल्याला इंटरनेटचे व्यसन लागण्याची भीती असल्याने इंटरनेटपासून चार हात लांब राहण्यासाठी अनेकांनी फेसबूक अकाऊण्ट डिलीट केले आहे.
त्यापाठोपाठ फेसबूकचा वाईट कस्टमर सपोर्ट, वारंवार बदलणारा इंटरफेस, अती जाहीरांचा सतत होणारा मारा यामुळे लोकांनी फेसबुक सोडले आहे.

फेसबूकची पॉप्यूलॅरीटी कमी झालेले देश
अमेरीका, ब्रिटन, रशिया, चीन, कॅनडा, नॉर्वे
फेसबूकची पॉप्यूलॅरीटी कायम असलेले देश
भारत, मॅक्सीको, अर्जेन्टीना, कोलंबिया, थायलंड, फिलीपीन्स, ब्राझील, फ्रान्स, तुर्की

कोण सोडते फेसबूक
ज्यांना फेसबुकची सवय लागण्याची भीती वाटते
फेसबुक सोडणा-यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक
ज्यांना फेसबुकवर अगदी कमी फ्रेण्ड्स आहेत
ज्यांची फेसबुकवरील अॅक्टीव्हीटी लेव्हल खूप कमी आहे.
फेसबूक प्रायव्हसीसाठी अॅप्स्
व्हर्च्युअल आयडेंटीटी सुसाईडचा वाढता ट्रेण्ड पाहून अनेक वेबसाईट्सने फेसबूकवरील माहिती लोकांपासून लपवून ठेवण्यासाठी अॅप्सही उपलब्ध करुन दिले आहेत. सुसाईड मशीन, सेपुकुसारख्या अॅप्समुळे तुमच्या फेसबुकवरील खासगी माहिती, फ्रेण्डलीस्ट, फोटो आणि तुमचे अकाऊण्ट लोकांना अॅक्सेस करता येणार नाही अशी सोय करुन देण्यात आली आहे.
भारतात काय स्थिती

भारतातील स्मार्टफोनची संख्या वाढत असल्याने सध्यातरी भारतातील अॅक्टीव्ह युझर्सची संख्या वाढत असली तरी काही हा ट्रेण्ड बदलू शकतो. सध्या पालकांचा फेसबूकवरील उपस्थीतीमुळे अनेकजण फेसबूक लॉगइन करणे टाळत असल्याचा ट्रेण्ड भारतात दिसून येत आहे. हर्चूअल आयजेन्टीटी सुसाईड ही त्याचीच पुढील पायरी असू शकते.
तुमच्यापैकी कोणाला कधी असे वाटले आहे का करावे एकदाचे अकाऊण्ट डिलीट आणि पुन्हा पहिल्यासारखे जगावे? इंटरनेटच्या या मायाजाळातून कायमचे बाहेर पडावे? व्हच्यूअल जगण्यापेक्षा ख-याखु-या आयुष्यात ख-याखु-या माणसांना आपला वेळ द्यावा?

No comments:
Post a Comment