Friday 5 July 2013

फेसबुकवर लिंक बघा, बॅग पॅक करा आणि ट्रेकला चला

पावसाळा सुरू झाला की पाठीवर सॅक टाकून ट्रेकर्स ट्रेकला निघतात. या ट्रेक्सचं प्लॅनिंग दोन-दोन महिने एफबी पेजेसवर आधी सुरू झालेलं असतं. पूर्वी प्रत्यक्ष भेटून, फोनवर ट्रेकचं प्लॅनिंग केलं जायचं, आता मात्र ही सगळी ठरवाठरवी चालते ती ऑनलाइन. या पेजमार्फत मेंबर्सना ट्रेकची माहिती देण्यात येते. ज्या गडावर जायचंय त्याच्या माहितीपासून ते कोणत्या तारखेला किती वाजता आणि कुठे भेटायचं, काय-काय सोबत घ्यायचं, बारीकसारीक तपशील देण्यात आलेला असतो....

'अरे, ही लिंक बघ... काय म्हणतोस, जाऊया का?', 'संकेत इज गोइंगी टू हरिशच्ंद्र फोर्ट...' 'माहुली ट्रेक इन्व्हीटेशन...' 'मी म्हणतो आपण जाऊया रे टीटीएमएम बेसिसवर आहे. तसंही आपल्याला गडाचा रस्ता कुठे माहिती आहे.' 'यू आर टॅग्ड इन फोटो' 'काय मस्त ट्रेक होता यार...', 'सो गाईज् बी रेडी फॉर दिस मान्सून कॉझ....' फेसबुकवर या आणि अशाच पोस्ट, फिडबॅक सध्या पाहायला मिळत आहे. तरुणाई ट्रेकच्या प्रेमात पडली आहे. अनेकांचे कव्हर फोटो, डीपी ट्रेकच्या फोटोजनी फेसबुकवरही मान्सूनची हिरवळ पसरली आहे. यामागचं कारण म्हणजे फेसबुकवर सध्या फुल टॉप गिअरमध्ये असणारे ट्रेकिंग ग्रुप्स... अनेकांच्या फ्रेंडलिस्टमधले लोक कुठल्या ना कुठल्या ट्रेक ग्रुपचे सदस्य आहेतच. काही ग्रुप मेंबर्सची संख्या हजारोत आहे. मज्जा मस्ती मैत्री या सूत्राच्या आधारे ट्रेक आयोजित केले जातात. मैत्री नसली तरी ट्रेकला गेल्यावर ती होतेच. त्यामुळेच ट्रेकवरुन आल्यावर लगेचच फ्रेंडलिस्ट अपडेट होतात.

ऑनलाइन ट्रेकिंग प्लॅन्स

ट्रेकिंग ग्रुप्सच्या अॅडमिनचे प्लॅन्स एप्रिल-मेपासूनच सुरु होतात. मे महिना संपण्याआधी या पेजेसवर मस्त टिझर्स फोटो पोस्ट केले जातात. मेंबर्सला कुठे जाण्यात रस आहे याबद्दल पोलमार्फत जाणून घेतलं जातं. जनता का मत खरोखरच जास्त असेल तर प्लॅनमध्ये बदल करुन एखादा अॅडिशनल ट्रेक अॅड केला जातो.

प्रत्येक ट्रेकसाठी एक इव्हेंटपेज बनतं. मात्र या इव्हेंटमध्ये फेसबुकवर जॉइन केलं याचा अर्थ तुमची जागा पक्की झाली असा घेतला जात नाही. तुम्हाला इव्हेंट होस्टला फेसबुक मेसेज पाठवून जागा कन्फर्म करावी लागते. या पेजमार्फत मेंबर्सना ट्रेकची सर्व माहिती देण्यात येते. किल्ला कसा आहे, त्याचं ऐतिहासिक महत्व. चढण कशी आहे, कोणत्या तारखेला किती वाजता आणि कुठे भेटायचं, कोणत्या स्टेशनला ट्रेन किती वाजता येणार, काय काय सोबत घ्यायचं, ट्रेकमध्ये काय काय काळजी घ्यायची याची नियमावली, तसंच ट्रेकची फी कशी देता येईल असा बारीकसारीक तपशील देण्यात आलेला असतो. अनेकदा सकाळी भेटल्यावरच रेल्वे स्टेशनवर ऑर्गनायझर्स केविलवाण्या चेह-याने सगळ्यांकडून पैसे गोळा करतात. त्यामुळे 'भाई छुट्टा नही है आगे जाओ'पासून सकाळी साडेपाचला सुरू होणारी मजा-मस्ती अगदी रात्री घरी जाईपर्यंत सुरु असते.

फेसबुकवर अॅक्टिव्ह असणारी पेजेस

- मुंबई हायकर्स, ट्रेक मेट्स इंडिया, रानवाटा
- सह्याद्री मित्र, ट्रेक क्षितीज, स्वच्छंद
- ट्रॅव्हलमास्टर गोगो, दुर्गवीर, महाराष्ट्र ट्रेकर्स, ब्रेक फ्री जर्नीज, वाइल्ड व्हिजन ट्रेक
- सह्याद्री ट्रेकिंग, माऊंटन मार्क्स ट्रेकिंग


No comments:

Post a Comment