Sunday, 20 October 2013

ऑफीसमध्ये मोबाईल नेट बंदी

अरे थांब बॉस आहे नंतर पींग करते..., वेट फॉर वाईल ही इज हीअर... अरे सॉलिड लोचा झालायं रे आमच्या ऑफीसमध्ये जॅमर लावण्याच मेल आलाय आता नो मोबाईल इंटरनेट दीवसभर ऑफलाईनच रहावे लागणार असे दीसतेय. मागील काही दिवसापासून ऑफीसला जाणा-या नेटक-यांच्या संवादत ही वाक्ये येऊ लागली आहेत. कारण आता अनेक ऑफीसेसने आपल्या कर्मचा-यांचा प्रोडक्टीव्ह वेळ मोबाईलवरील व्हॅट्सअॅप चॅट, फेसबूक आणि सर्फींगमध्ये जाऊन नये यासाठी सेटिंग लावण्यास सुरवात केली आहे. मोबाईल जॅमरच्या पर्यायामुळे अनेकांचा ऑनलाइन राहण्याचा लोच्या होणार आहे.

कंप्यूटरनंतर आता मोबाईल नेट बंदी
?
ज्यावेळी भारतामध्ये फेसबुकचे फॅड होते त्यावेळी २०१०पासून कंपन्यांनी ऑफीसेसमधून सोशलनेटवर्कींग साईट्सचा अॅक्सेस बॅन केला होता. गुगलने गुगल प्लस सर्वीस सुरु केल्यापासून अनेक कंपन्यांनी तर गुगलचे सर्व्हरही बॅन केले आहेत. मात्र मागील वर्षभराच्या काळात स्वत आणि मस्त स्मार्टफोन सर्वाच्याच खिशात दिसू लागल्याने ऑफीसच्या कंप्यूटरवरुन होणार सर्फिंग अगदीच पर्सनल लेव्हलवर मोबाईलवरुन होऊ लागले आहेत. काही हजारात उपलब्ध होणारे मोबाईल, स्वस्त: इंटरनेट प्लॅन्स अनेक ऑफीसेसमध्ये असणारे फ्री वायफाय यामुळे अनेकांचा ऑफीसच्या वेळेतील मैल्यावान वेळ पर्सनल चॅटसाठी जाऊ लागला.

काय उपाय केले आहेत कंपन्यांनी

सरेंडर मोबाईल
काही कंपन्यांमध्ये वर्कींग डेक्सवर जाण्याआधी आपला मोबाईल सरेंडर करण्यासाठी ऑफीसच्या प्रवेशद्वरातच काऊण्टर असून कामाच्या वेळेत मोबाईल सरेंडर करावा लागतो. आठ तासाच्या कामानंतर तो मोबाईल परत करण्यात येतो. मात्र अनेकदा महत्वाचे कॉल मिस होत असल्याने कर्मचा-यांना ही पद्धत सोयीस्कर वाटत नाही.

मोबाईल जॅमर- कॉलेजमधील वर्गामध्ये लावण्यात येणा-या जॅमरप्रमाणे अनेक ऑफीसेसने मोबाईल जॅमबद्दल विचार करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी जॅमर लावण्यात आले असून हे जॅमर दोनप्रकारचे असतात. एकाप्रकारेमध्ये फक्त इंटरनेट ब्लॅक करण्यात येते तर काही ठिकाणी मोबाईलच्या सिमची रेंजच ब्लॅक करण्यात येते. मात्र इंटरनेट ब्लॉकचा पर्यायामुळे फोन कॉल्स आणि मेसेजची अडचण येत नसल्याने या पर्याय लवकरच सर्व ऑफीसेसमध्ये वापरण्यात येण्याची शक्यता आहे.

ओन्ली बेसीक फोन्स
अनेक कंपन्यांनी जॅमरचा खर्चीक पर्यायाला उपाय म्हणून कर्मचा-यांनी कामावर येताना मोबाईल फोन आणल्यास तो बेसीक मोबाईल फोन असावा अशी अट घातली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरा नसलेले मोबाईल अणण्याची अटही या कंपन्यांना उपयोगी ठरत आहे. अनेक कॅमेरा नसणा-या मोबाईलमध्ये इंटरनेटची सुविधाच नसल्याने जॅमरचा खर्च येत नाही.

वायफाय बंद
मोबाईलवरुन ऑफीसची कामे करता येईल या दृष्टीने देऊ केलेल्या वायफायवरुन व्हॅट्सअॅप आणि फेसबुकचा जास्त वापर करुन लागल्याने अनेक कंपन्याने मोफत वायफाय बंद तर केले आहेच त्याशिवाय इंटरनेट रेंजवर बंदी घालण्यासाठी जॅमर लावण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहचले आहेत.

आता कर्मचा-यांवर ऑफीसेसने ही सोशल बंदी घालण्याचे ठरवले असले तरी ती कितपत टिकतेय हे अत्ताच सांगणे कठीण आहे. पण तुम्हाला या बद्दल काय वाटते ही बंदी असावी का? एखादी व्यक्ती आपले काम पूर्ण करुन जर थोडावेळ मोबाईलवर चॅठ करत असेल तर त्यात चुक काय? म्हणजे कर्मचा-यांनी काम ठेऊन टाईमपास केल्यास त्यांच्यावर कारवाई होणे योग्यच आहे मात्र सरसकट बंदी किती योग्य आहे?