Monday, 1 July 2013

...म्हणून हा ब्लॉग!

hiiii… gmJ … whats up dude?, असा मेसेज व्हॉट्स अॅपवरून आल्याशिवाय हल्ली अनेकांची सकाळ होत नाही... घराबाहेर पडताना बाकी काही विसरलो तरी चालेल, पण खिशात मोबाइल आहे की नाही, हे आपण दोन-तीन वेळा चेक करतोच करतो... ट्रेनचा प्रवास करताना शेकडो सहप्रवासी अवतीभवती असतानाही तरुणाईला टेम्पल रन अधिक जवळचा वाटतो... कॉलेजमध्ये जाणा-या मुलाकडे स्मार्टफोन नसणं हा तर जणू गुन्हाच मानला जातो... तसंच, फेसबुकवर अकाउंट नसणं हे तर अतिमागास असल्याचंच लक्षण ठरतं... पहिली-दुसरीतली मुलांची इवली-इवली बोटं टचस्क्रीन मोबाइलवर, कॉम्प्युटरच्या की-बोर्डवर ज्या सफाईनं फिरतात, ते पाहून आजी-आजोबा अक्षरशः बिचकतात...

खरंच, आपलं जीवन टेक्नॉलॉजीनं इतकं वेढलं गेलंय की, मोबाइल, कॉम्प्युटर, फेसबुक, व्हॉट्स अॅपशिवाय आपला दिवस पूर्ण होणं अशक्यच होऊन बसलंय. मोबाइलवर वाजलेला अलार्म ऐकून आपण उठतो आणि रात्री झोपण्याआधी न चुकता फेसबुक अकाउंट चेक करतो. या टेक्नॉलॉजीची आपल्याला सवयच लागलेय आणि काही प्रमाणात तो गरजेचा भागही झालाय. कारण, व्हॉट्स अॅपवर नसू तर मित्रांचे प्लॅन आपल्याला कळतच नाहीत, त्यांच्यापासून आपण दुरावतो, एकटे पडतो.

image courtesy - www.socialsellingu.com
काय म्हणतोस, तुझा ईमेल आयडी नाही? आईशप्पथ, तू मोबाइल वापरत नाहीस? बाबा आझमच्या जमान्यात राहतोस काय? तू अजून तो डबडा मोबाइलच वापरतोस? अरे जग कुठे चाललंय आणि तू कुठे आहेस? आम्ही घेऊन देऊ का तुला एखादा मोबाईल?... असे बरेच टॉन्ट आणि टोमणे टेक्नोफोबिक तरुणाला ऐकावे लागतात. टेक्नॉलॉजीला घाबरलात, तर इतरांबरोबर तुम्ही धावूच शकत नाही, अशी आजची परिस्थिती आहे.

पण त्याचवेळी, या टेक्नोलॉजीमुळे अनेक गोष्टी आपण हरवून बसलो आहोत. पोस्टमन आपल्याला आठवतच नाही. नवनवी पुस्तकं वाचण्यापेक्षा फेसबुकवर
टीपी करण्यातच शाळेतल्या मुलांचा जास्त वेळ जातो. गुगलशिवाय आपली प्रोजेक्टस् पूर्ण होत नाहीत. गुगल सर्चमुळे तर स्मरणशक्तीचंच विस्मरण होऊ लागलंय. खेळाची मैदानं फक्त फीफा वर्ल्डकपसारख्या गेममध्येच असतात, असा अनेकांचा समज झालाय. १० मिनिटांतून एकदा मोबाइल पाहिल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. दिवसभरातून एकदा तरी कॉल किंवा मेसेज केला नाही तर आपल्याला अस्वस्थ वाटतं. त्यामुळे आपल्या जीवनातली शांतता, स्वतःशी होणारा संवाद, कुटुंबाबद्दलची ओढ हे सगळं हळूहळू निसटत चाललंय.   

पण, थांबला तो संपला, या उक्तीप्रमाणे काळासोबत चालणंही तितकंच मस्ट आहे.  टेनक्नोलॉजीमुळे आपल्या बोलण्याचा पद्धतीपासून ते कपड्याच्या फॅशनपर्यंत सर्व काही बदललं आहे. त्याबद्दलच मी या ब्लॉगमधून बोलणार आहे. माझा ब्लॉग नक्कीच बोअरिंग नसेल, कारण यामध्ये माझे आणि माझ्या मित्रांचे अनुभवाचे बोल असतील. त्यामुळे यातला कन्टेन्ट १०१ टक्के ओरिजनल असणार आहे. मग, आमचे अनुभव वाचायला आणि तुमचे अनुभव शेअर करायला तयार व्हा!

2 comments:

  1. Swapnil you are 100% correct, technology has taken away some of the interesting people and things from us and of course the existence of Technology is making the day to day things historical, like you mentioned about the postman, whom we don't see quiet often now a days, also the school students and kids are becoming the victims of increasing stress and obesity since they don't opt to participate in any kind of activities in the school.

    ReplyDelete
  2. काळ बदलतोय, नवीन तंत्राद्यान येतंय.तंत्राद्यान हे माणसाने माणसाच्या सोयी साठी बनवला आहे, माणूस तंत्रद्याना साठी बनला माही हे लक्षात ठेवला म्हणजे झालं. एखादा तंत्राद्यान उदाहरणार्थ,"Whatsapp" कोणी वापरात नसेल तर त्याला जुनाट मनानं म्हणजे वैचारिक मागासलेपणा दाखवण्या सारखा आहे.

    ReplyDelete