Sunday, 18 August 2013

कुठे गेले ते व्हिडीओ गेम्स...

माझ्याकडे कालच घेतलेली नवीन कॅसेट आहे तीच्यामध्ये ९,९९९ गेम्स आहेत... अरे यार ती पाचव्या लेवलमधील उडी किती कठीण आहे... नाही रे तो दुसरा दरवाज्याच्यामागे जास्त पॉइण्ट्स आहेत... माझ्या घरी येऊन माझ्याशी खेळताना हायस्ट स्कोअर कर तर मग तुला मानला... मारीयोपेक्षा टॅण्कस्च मस्त आहे...

काही वर्षापूर्वी उन्हाळ्यानंतरही अगदी दिवळीच्या सुट्टीची चाहूल लागे पर्यंत बच्चे कंपनीच्या चर्चेत एकू येणारे हे संवाद सध्या आऊटडेटेड झाले आहेत. त्याएवजी आता फेसबूक, मोबईल अॅप आणि पालकांनी सक्तीने लावलेल्या प्रशिक्षण शिबिराच्या चर्चांनी घेतली आहे.

१९९५ ते २००५ या दहा वर्षाच्या काळात टीव्हीवर खेळता येणा-या व्हिडीओ गेम्सने मुलांवर अक्षरश
: गारुड केले होते. १९९१ नंतरच्या आर्थिक घोरणांत बदल झाल्यामुळे भारतात आलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे टीव्ही व्हिडीओ गेम्स... नव्वदचे दशक संपता संपता हा ट्रेण्ड बाजारात आला. अगदी दीड हाजाराला मिळणा-या मेड इन चायनापासून हजारो रुपयांचे ब्रॅण्डेड व्हिडीओ गेमसेट हातोहात विकले गेले होते. असे एकही घर नव्हते जेथे लहान मुले होती माक्ष व्हिडीओ गेम सेट नव्हता. अनेकांनी तर प्रत्येक वर्षी प्रत्येक सुट्टीसाठी एक याप्रमाणे सर्व प्रकारचे व्हिडीओ गेम्स युझ अॅण्ड थ्रो बेसेसवर वापरल्याचे सांगतात. त्यातील बहुतेक जणांनी बालपणीच्या आठवणीच्या वस्तूमध्ये तो कॅसेटचा स्लॉट असणारा बॉक्स, हाडासारखे दिसणारे कन्ट्रोलर संग्रहित ठेवले आहेत.


उन्हाळ्याची सुट्टी लागली रे लागली की पालकांकडे हट्ट करुन गेमसेट मिळवण्याची परिक्षा मुलांना पार करावी लागत असे. मात्र एकदा का मस्का मारण्यात यशस्वी ठरले तर सुट्टी सुखात जात असे नाही तर आहेतच आपले मित्र ज्यांच्यावर त्यांच्या आईवडिलांची कृपा झाल्याने त्यांना व्हिडीओ गेम मिळालेला असतो. मग दुपारी त्याच्या घरी स्पर्धा लावणे आणि त्यानंतर संध्याकाळी मैदानी खेळ यात सुट्टी कधी संपायची कळतच नसे. या गेमसेटबरोबर मिळालेल्या कॅसेटमधील गेम्स खेळून खेळून कंटाळा आला की नवीन कॅसेटसाठी हट्ट आणि ही कॅसेट घेताना त्यातील गेम्सपेक्षा त्यांच्या रंगाला प्राधान्य देण्यात येत असे. शंभर दिडशे रुपयांना मिळणारी कॅसेट आणली कि पुन्हा नव्या जोमाने टीव्हीसमोर गेम खेळ्याचा उत्साह संचारत असे. मात्र ९,९९९ इन वन असे लिहूनही खेळलेलेचा गेम असल्याचे पाहूण वाईट वाटायचे मात्र हेच कारण देत नवीन कॅसेटचा हट्ट करणे. उन्हाळा संपून शाळा सुरु होईपर्यंत हाच दिनक्रम सुरु असे. जुनच्या दुस-या आठवड्यात शाळा सुरु झाल्यावर सर्व काही नवीन नवीन मिळाल्याच्या आनंदात दिवाळीपर्यंत मारियो आपल्या दोस्तासह कपाटात कायमचा बंद होत असे.

हे गेम्स खेळण्याआधी असणारी अडथळ्यांची शर्यत पार करताना आपण एखादे इलेट्रीशीयन असल्यासारखेच वाटत असे. आईवडिलांना कळणार नाही इतकी वायरींग करता येत असल्याने मुलांची कॉलर एकदम टाइट असे. सर्व वायर्स बरोबर लावणे, एव्ही टीव्हीची सेटींग चेक करणे. गेमचा चार्जर एक्ठेशनने लावणे. वायर अखूड असल्यास खाली उशा, पुस्तके, गेम बॉक्सचे कव्हरचा टेकू देऊन त्याला लाल, पिवळ्या, पांढ-या कलरच्या वायर योग्य जागी जोडणे, पुढे पोर्टल नसेल तर टीव्हीमागून वायरींग करण्यासाठी धडपडणे, ही सर्व सेटींग झाल्यानंतर दिवसभर या सेटअपला धक्क न लावता तिच्या आजूबाजूलाही कोणी फिरकणार नाही याची काळजी घेणे यामध्ये गेम खेळण्यापेक्षा जास्त मज्जा येत असे. महाग गेम असला तर डक हण्टसारखे गेम खेळ्यासाठी दिलेली ती गन वापरण्याचा अनुभव आपल्याला नेमबाज असल्याचा भास होत असे.

मात्र जसे टीव्हीला सोबत करायला कम्प्यूटर आणि मोबाईलने आपले पाय घराघरात रोवले त्यामप्रमाणे या व्हिडीओ गेम्सला घरा आणि मनाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर रोडररॅशपासून सुरु झालेला गेमचा सपाटा अत्ताच्या अॅग्रीबर्ड्सपर्यंत येऊन पोहचला आहे. त्यामुळेच घरातील टीव्हीवर खेळता येणारे व्हिडीओ गेम पुढच्या पिढीपर्यंत पोहचलेच नाहीत. आज ते व्हिडीओ गेम्स ९०च्या दशकात जन्मलेल्या आणि सध्याच्या तरुणाईच्या कपाटांमध्ये पडून आहेत. तरी फेसबूकवर अधूनमधून या गेम्सची आठवण येत असल्याचे फोटो आणि स्टेटस अपडेट होत असतात. इतकीच काय ती या गेम्सची आजाच्या टेक्नलोजीमधील उपस्थिती. आजची मुले उन्हाळ्यात ऑनलाइन गेम्स खेळता, फेसबूकवर टाइमपास करतात आणि शिबिरांमध्ये अडकून आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे गेम्स पोहचणे तसेही शक्यच नाहीय.

हे गेम्स खेळतानाचे जुगाड
> बॉक्स हलणार नाही याची स्पेशल काळजी घेणे
> कॅसेटचे कव्हर तुटले तर फक्त त्या पांढ-या आकृत्या असणा-या हिरव्या चिप वापरुन नवीन कॅसेट मिळे पर्यंत दिवस ढकलणे.
> चीपही चालत नसेल तर ती खोडरबरने साफ करणे(कारण हा प्रिय मित्राचा सल्ला असतो)
> डक हण्ट खेळताना गनमुळे वायर कनेक्शन तुटणार नाही म्हणून टीव्ही स्क्रीनच्या एकदम जवळ जाऊन नेम साधणे.

टॉप गेम्स
> मारीयो
> कॉन्ट्रा
> टँक्स
> ऑलंपिक
> सर्कस
> डक हण्ट

> स्ट्रीट फाइट
> एफ वन रेस
> टेनिस
> फुटबॉल

No comments:

Post a Comment